बिग बॉसने घेतली पहिली विकेट… मैथिली जावकर घराबाहेर

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिजनमधून पहिला कोणता स्पर्धक बाहेर जाणार याची सर्वांना उत्सुकता होती. या आठवडय़ात पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, वीणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते. अखेर या स्पर्धकांमधून मैथिली जावकर घराबाहेर झाली आहे.

महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर मैथिलीला तिच्या घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले तेंव्हा ती म्हणाली, माझ्यासोबत सगळेच उद्धट, उर्मट अगदी निवडून या घरात आणले आहेत, जे दुसऱ्यांचे अजिबात ऐकत नाहीत. घरात कोण तुला मित्र म्हणून मिळाले असे विचारले तेंव्हा मैथिलीने सांगितले, नेहा सोडून घरात सगळेच मला जवळचे होते आणि आहेत. सगळ्यांशी माझी घट्ट मैत्री झाली. बिचुकले यांनी मला धाकटी बहीण तर माधवने मला मोठी बहीण म्हंटले, मला या घरात दोन भाऊ मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या