मैत्रिणीच्या लग्नात नाचून दिपीका झाली आजारी

870

दिवाळी सरली असून सगळीकडे लगीनघाई सुरू झाली आहे. त्यातच जर ते लग्न आणि मित्र किंवा मैत्रीणीचे असेल तर त्याची वेगळीच धम्माल असते.  बॉलीवूडची अभिनेत्री दिपीका पादुकोण ही देखील पती रणवीर सिंह सोबत तिच्या खास मैत्रीणीच्या लग्नाला बंगळुरुला गेली होती.

तिथे या दोघांनीही झिंगाट डान्स करुन धम्माल उडवून टाकली.

dipika-padukon

पण त्यानंतर दीपिका आजारी पडली असून तापाने फणफणली आहे.dipika-padukon-2

त्याच बरोबर तीने तीचा फोटो देखील शेअर केला त्यात तीने तिच्या फोटोला थर्मामीटर चे स्टिकर लावल्याचे दिसून येते.आणि फोटो सोबत लिहीले होते की ‘जेव्हा मैत्रीणीचे लग्न असते तेव्हा खूप धमाल येते.’ तसेच तीने लग्नाचे फोटो देखील शेअर केले आहेत.चित्रपटाविषयी बोलायच झालं तर  आगामी  ’83’ या चित्रपटात दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंह  एकत्र दिसून येणार आहे.

तर दिपीका पादुकोण चा मेघना गुलजार दिग्दर्शित  आगामी चित्रपट ‘छपाक’ मध्ये लक्ष्मी अग्रवाल सोबत झालेल्या एसिड अटॅक या सत्य घटनेवर आधारीत चित्रपट तयार केला असून दिपीका पादुकोण लक्ष्मी अग्रवाल ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दिपीका पादुकोण  चा मेकअप सुंदर केल्याचे दिसून येते.

आपली प्रतिक्रिया द्या