लोकनेते सोळंके कारखान्याचा शेतकऱ्यांना 100 रुपयांचा हप्ता

881

माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने गतवर्षी गाळप हंगामात 7 लाख 40 हजार मे.टन उसाचे गाळप केले. त्या उसास यापूर्वी 2200/- रुपये प्रति टन अदा करण्यात आले असून आणखी 100 रुपये 10 ऑक्टोबर पर्यंत देण्यात येणार असल्याची घोषणा चेअरमन प्रकाश सोळंके यांनी केली.

मराठवाड्यात सलग 30 हंगाम पूर्ण केलेल्या लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या गुरुवारी आयोजित 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ संचालक धैयशील सोळंके, उपाध्यक्ष वसंतराव घाटूळ, सभापती अशोक डक, उपसभापती नीलकंठ भोसले,जयसिंह सोळंके,जयदत्त नरवडे, सुभाष सोळंके, डॉ.वसीम मनसबदार, सुरेश धुमाळ,सर्व संचालक,कार्यकारी संचालक एम. डी. घोरपडे, सचिव सुरेश लगड यांची उपस्थिती होती. याप्रसंगी चेअरमन प्रकाश सोळंके म्हणाले की, या कारखान्याची एफ आर पी 1976/- रुपये असताना इतरांच्या तुलनेत आपण 2300 रुपये दर देत आहोत. कारखान्यास 476.87 लाखांचा नफा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या