जादुची पिशवी

130

शिल्पा सुर्वे

अंडी, भाजी, फळं असो की आणखी काही जिन्नस. प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकायचे आणि निघायचे. पिशवी नसली तरी विकत घ्यायची. दुकानदारही हटकून ग्राहकांना पिशवी देतात. एक , दोन रुपयांच्या पिशव्या खिशाला काही महाग पडत नाहीत. त्यामुळे त्या घेण्यासाठी सर्रास ग्राहकांचा कल असतो. पुढे पुढे प्लॅस्टिकची कॅरी बॅग दैनंदिनी जीवनाचा भागच बनून गेली. मात्र हे प्लॅस्टिक निसर्गाला किती हानिकारक आहे हे हळूहळू लक्षात येऊ लागले. त्याचे विघटन होत नसल्यामुळे त्याचा त्रास पर्यावरणाला होतो. प्राण्यांच्या पोटात प्लॅस्टिक जाऊन त्यांचा मृत्यू ओढावतो, हे लक्षात घेऊन प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती सुरू करण्यात आली. जनजागृती करणे ठीक आहे, पण त्याच्या वापराला आळा घालण्यासाठी नागरिकांना ‘सबस्टिट्यूट’ देणे गरजेचे आहे. जोपर्यंत प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्लॅस्टिकबंदीचे ध्येय गाठता येणार नाही. हेच लक्षात घेऊन अश्वथ हेगडे या युवकाने प्लॅस्टिकच्या पिशवीला पर्यायी अशी जादूची पिशवी बनवण्याचा चंग बांधला. अश्वथच्या चार वर्षांच्या अथक संशोधनातून अखेर ही पिशवी साकार झाली असून पुढच्या महिन्यात बंगळुरूमध्ये तिचे शानदार लाँचिंग होणार आहे. अश्वथची पाण्यात विरघरळणारी इकोफ्रेंडली कॅरी बॅग सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

अश्वथ हेगडे मूळचा मंगलोरचा. त्यांच्या अन्विग्रीन बायोटेक  कंपनीने नैसर्गिक स्टार्च, वनस्पती तेल, व्हेज बिन्सपासून या पर्यावरणपूरक कॅरी बॅग तयार केल्या आहेत. अश्वथ आणि १२ पर्यावरणतज्ज्ञांच्या टीमची ही सिक्रेट टेक्नॉलॉजी आहे. या इझी पिशव्यांची खासियत म्हणजे त्या ८० डिग्री गरम पाण्यात टाकल्या की काही सेकंदांत विरघळतात. तसेच साध्या पाण्यात ठेवल्या की दोन दिवसांत विरघळतात. या पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्या तरी त्यांना काहीही त्रास होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. १०० टक्के बायोडीग्रेडेबल असे हे उत्पादन आहे. त्याला जाळल्यानंतर कागदासारखी त्याची राख होते. या इझी पिशवीला कर्नाटक स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सेंट्रल इनस्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनीअिंरग व श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्चने मान्यता दिली आहे.

गेल्या ५० वर्षांत प्लॅस्टिकचा वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन पोहोचला आहे. दरदिवशी देशात १५ हजार टन प्लॅस्टिक कचरा तयार होतो, याकडे अश्वथने लक्ष वेधून इजी बॅग्जचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इजी बॅग्ज अजून बंगळुरूच्या दुकानात उपलब्ध नसल्या तरी लोकांमध्ये त्याबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. पहिल्या दोन दिवसांत वंâपनीकडे तब्बल ३००० हजार ईमेल आले. ईमेल्सच्या माध्यमातून लोकांनी प्रोडक्टची माहिती घेतली तसेच ऑर्डर दिल्या. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो इजी बॅग्जच्या किमतीचा. याबाबत अश्वथ म्हणाला,  आमच्या कॅरी बॅग अडीच ते तीन रुपये प्रति नग या दराने उपलब्ध आहेत. म्हणजेच बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकच्या किमतीपेक्षा फक्त जरा जास्त (साधारण एक रुपया जास्त) तर कापडी पिशव्यांपेक्षा कितीतरी स्वस्त असा दर आम्ही ठेवला आहे. अन्विग्रीन कंपनी सध्या मोठ्या प्रमाणात कॅरी बॅगचे उत्पादन करीत आहे. फॅक्टरीत कित्येक टनमध्ये उत्पादन सुरू आहे. बंगळुरूमधील छोटी दुकाने, स्टोअर्स, हॉटेल चेन्स, मॉल्स येथून मोठ्या ऑर्डर्सचे प्रमाण लक्षात घेता पुरवठ्यामध्ये कुठे कमी पडू नये यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. इजी वॅâरी बॅगबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या बॅग शेतकNयांना जोड उत्पादनाचे साधन ठरणार आहेत. बॅगसाठी लागणारा माल थेट शेतकNयांकडून घेतला जातो. भविष्यात अनेक शेतकरी कंपनीशी जोडले जाणार असल्याचे अश्वथ यांनी सांगितले.

बंगळुरूमध्ये इजी बॅगचे लाँचिंग जानेवारी २०१७ मध्ये होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई आणि दिल्ली शहरातही बॅग दाखल होतील. कतार आणि दुबई येथेही बॅगांना मार्केट उपलब्ध होणार आहे. याबाबत अश्वथ आणि त्याची टीम खूप आशावादी आहे. इकोफ्रेंडली हिंदुस्थानच्या नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा त्यामध्ये स्वतःचे योगदान अश्वथने दिले आहे. इजी बॅगच्या रूपाने नवे तंत्र देशाला गवसले आहे. या नुसत्या कॅरी बॅग नसून क्रांतिकारी बॅग आहेत, असे अश्वथ सांगतो. या बॅग आपल्या सर्वांचे सुंदर आणि हरित भविष्य निश्चितच ‘कॅरी’ करतील.

 

आपली प्रतिक्रिया द्या