सीमेवर पाकड्यांचा हल्ला, एका मेजरसह दोन जवान शहीद

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू-कश्मीर सीमेवर राजौरी जिह्यात पाकडय़ांनी केलेल्या आयईडी स्फोटात हिंदुस्थानी लष्कराचे एक मेजर आणि एक जवान शहीद झाले आहेत, तर याच जिह्यात सुंदरबेनी सेक्टरमध्येही पाकडय़ांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये लष्कराचे पोर्टर हेमराज हे शहीद झाले. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानी रेंजर्सकडून अनेकदा शस्त्र्ासंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे.

राजौरी जिह्यात नौशेरा सेक्टरमध्ये हा स्फोट झाला. सीमेलगतच्या परिसरात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भूसुरुंग स्फोटके पुरून ठेवली आहेत. या परिसरात लाम बेलेट येथे हिंदुस्थानी लष्करी जवानांची गस्त सुरू असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला. त्यात एक मेजर आणि एका जवान शहीद झाले.