तरुणाला जीपला बांधणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याचा गौरव

18

नवी दिल्ली ः कश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्या फुटीरतावाद्यांपासून बचाव करण्यासाठी लष्करी जीपला एका कश्मिरी तरुणाला बांधणारे मेजर लितूल गोगोई यांचा लष्करातर्फे गौरव करण्यात आला आहे.

लष्करप्रमुख विपीन रावत यांच्या हस्ते गोगोई यांचा ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफस् कमेनडेशन कार्ड’ देऊन गौरव करण्यात आला आहे. तरुणाला जीपला बांधण्याच्या घटनेची चौकशी अजून सुरू असली तरी त्यांनी हिंसाचारादरम्यान केलेल्या कारवाईस या गौरवातून लष्कराने पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या