नगर – एमआयडीसी भागात वृक्षतोड जोमात

सामना प्रतिनिधी, नगर

एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला जातो. कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. झाडे जवगण्यापेक्षा झाडे तोडणे जणू माहिमच हाती घेतली की काय अशी अवस्था सध्या नगर शहरात पाहिला मिळत आहे. एमआयडीसी परिसरात वृक्षांची कत्तल केली जात असून त्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असाच प्रश्न पडला आहे.

शहरातील विविध भागात वृक्षतोडी केली जात असून त्यावर नियंत्रण कोण ठेवणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. रस्ता मोठ्या करण्याच्या नवाखाली वृक्षाची कत्तल होत असून यावर आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. वास्तविक पाहता मृत झाडे तोडली तर काही नाही मात्र जिवंत झाडे तोडून कोण काय साध्य कारणार आहे हा प्रश्न विचारला जात आहे.

एकीकडे सरकार झाडे लावा पर्यावरण वाचवा असा संदेश देत असताना दुसरीकडे मात्र वृक्षांची होणारी खुलेआम कत्तल पाहता निश्चित धोरण काय याचाले आहे हेच समजत नसल्योन वृक्षाची कत्तल करणार्‍यांवर कोणी कारवाई करणार का असाच प्रश्न निर्माण झाल आहे.