‘पोरगं मजेतय’ पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये!

आपल्या मातीतले, रोजच्या जगण्यातले विषय राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांनी ‘रिंगण’, ‘कागर’ यांसारख्या चित्रपटांतून आजवर मराठी रुपेरी पडद्यावर आणले आहेत. मकरंद माने पुन्हा एका नव्या कलाकृतीसह सज्ज झाले आहेत. त्यांचा ‘पोरगं मजेतय’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मधील मराठी चित्रपट विभागामध्ये या चित्रपटाची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यातील संवाद-विसंवाद याचा सुरेख मेळ या चित्रपटातून साधला आहे.     

आपली प्रतिक्रिया द्या