गोराई महापालिका दवाखान्याच्या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारा!

मुंबईतील बोरिवली पश्चिमेला गोराई-1 येथे असणाऱया महानगरपालिका दवाखान्याच्या जागी अद्ययावत रुग्णालय उभारा, अशी मागणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली.

गोराई-1 व गोराई-2 मध्ये हजारो नागरिक राहतात. गोराई-1 मध्ये महानगरपालिकेचा एकमेव दवाखाना आहे. या दवाखान्यात डॉक्टर, परिचारिका व सफाई कामगार यांची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, याकडे आमदार पोतनीस यांनी या सूचनेद्वारे लक्ष वेधले आहे.

सदर दवाखाना बहुमजली करून अद्ययावत वीस ते पंचवीस खाटांचे रुग्णालयही तिथे उभारता येईल अशी मागणी पोतनीस यांनी केली आहे.