पहिल्या इयत्तेपासून पदवीपर्यंत मराठी सक्तीची करा-अक्षयकुमार काळे

26

सामना ऑनलाईन, नंदुरबार

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पहिल्या इतयत्तेपासून पदवीपर्यंत मराठी भाषा सक्तीची केली पाहीजे असं मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केलं. ते नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

या साहित्य संमेलनाची सुरवात ग्रंथ दिंडीने झाली ज्यामध्ये  आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी कलापथके सहभागी झाली होती. संत गुलाम महाराज साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या विविध सभागृहात परिसंवाद संपन्न झाले हे साहित्य संमेलन आदिवासी भागातील साहित्यीकासाठी एक पर्वणी असल्याचे साहित्यकांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या