‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

33

सामना ऑनलाईन । मुंबई

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळे इतके बिझी झाले आहेत की ‘फॅमिली टाईम’ ही कन्सेप्ट दुर्लक्षित होत चालली आहे. काम.. काम.. काम.. आणि त्यातून बाहेर आलं की प्रत्येकाचे स्वतःच्या प्रॉब्लेम्सचे गुणगान! अरे देवा… इथे प्रत्येकालाच आपले प्रॉब्लेम्स किती मोठे वाटतात ना? अशा वेळी “मला काहीच प्रॉब्लेम नाही” असं म्हणणाऱ्या कोणाची हाक ऐकू आली की सगळ्यांच्या नजरा कशा त्यांच्याकडे एकवटतात. सध्या असंच “मला काही प्रॉब्लेम नाही” म्हणणारे गश्मीर महाजनी आणि स्पृहा जोशी सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेले आहेत.

स्पृहा आणि गश्मीर बरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईक व सतीश आळेकर यांसारखे नामवंत कलाकार देखील “मला काहीच प्रॉब्लेम नाही” म्हणतं असलेले दिसून येत आहेत. नक्की काय गडबड आहे काही एक कळायला मार्ग नाहीये. ह्यांना खरंच काहीच प्रॉब्लेम्स नसतील का? की आपले प्रॉब्लेम्स लपविण्यासाठीचा हा त्यांचा अट्टाहास सुरु आहे? येत्या २८ जुलै ला याचा उलगडा होईलच. नक्की कळू तर देत ह्यांना काहीचं प्रॉब्लेम कसा नाही ते!

आपली प्रतिक्रिया द्या