Malaika Arora-Arjun Kapoor breakup – अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांचा प्रेमभंग झाला ?

arjun-kapoor-malaika-arora

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे बॉलीवूडमधील एक सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रेमी जोडप्यांपैकी एक जोडपं मानलं जातं. अनेकांनी या जोडप्याला विजोड जोडपं असं म्हणून हिणवलं आहे. मलायका ही अर्जुन कपूरपेक्षा वयाने मोठी असून तिने अरबाझ खानला दिलेला घटस्फोट हा अर्जुनसाठीच दिला होता अशा चर्चा त्यावेळी रंगलेल्या होत्या. वयाने लहान असला तरी अर्जुन कपूर हा मलायकाच्या तुलनेत फारसा देखणा नसल्याने ते विजोड जोडपं असल्याची त्यांच्यावर टीका होत होती. या दोघांनी वेळोवेळी ट्रोलर्सना उत्तरं देण्याचं काम केलं होतं, मात्र तरीही त्यांच्यावर होणारी टीका थांबली नव्हती. हे जोडपं आता वेगळं झालं असल्याच्या आता बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या आहेत. दोघांमध्ये बिनसलं असून दोघे आता एकमेकांचे तोंडही पाहायला तयार नसल्याचं सांगितलं जातंय.

बॉलीवूड लाईफने दिलेल्या वृत्तात म्हटलंय की गेल्या 6 दिवसांपासून मलायका घराबाहेर पडलेली नाहीये. ती दु:खी झाली असून तिला कोणालाही भेटायची सध्या इच्छा नाहीये असंही या बातमीत म्हटलं आहे. अर्जुन कपूर हा तिला या सहा दिवसांत एकदाही भेटायला आलेला नाहीये. अर्जुन त्याची बहीण रिया हिच्या घरी जेवायला गेला होता, रियाचं घर हे मलायकाच्या घराजवळच आहे. असं असतानाही तो मलायकाच्या घरी गेला नव्हता. रियाच्या घरी अर्जुन जेव्हा केव्हा जेवायला जातो तेव्हा मलायकाही तिथे येत असते. मात्र यंदा असं झालं नाही. यावरून दोघांमधील नातं पूर्णपणे फाटलं असून दोघे वेगळे झाले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.