
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या स्मार्टनेस आणि फिटनेस मुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
मलायका सध्या 48 वर्षाची आहे. या वयातही ती अतिशय सुंदर दिसते आणि पंचविशीतील तरुणीलाही लाजवेल असा तिचा फिटनेस आहे.
नुकतेच मलायका हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लाल रंगाच्या स्ट्रेप्लेस गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत. ती यात एवढी सुंदर दिसतेय की पाहणाऱ्याच्या नजरा हटत नाहीय.
मलायकाने नजाकतीसह दिलेल्या वेगवेगळ्या पोझ पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.