आता मलायका अरोरासोबत करा हॅलो हॅलो

सामना ऑनलाईन । मुंबई

आयटम साँग्ससाठी ओळखली जाणारी बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या लटक्या झटक्यांचे अनेक चाहते आहेत. मलायकाचा एक नवीन आयटम साँग रिलीज झाले आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘फटका’ या चित्रपटात मलायकाने आयटम साँग केले आाहे. मुन्नी बदनाम हुई सारखेच काहीसे हे गाणे आहे. आता हे नवीन गाणे तितकेच प्रसिद्ध होते की नाही ते बघावे लागणार आहे.

मलायकावर चित्रीत झालेले हॅलो हॅलो हे गाणे गुलझार यांनी लिहले असून विशाल भारद्वाज यांनी त्यााला संगीत दिले आहे. पठाका या चित्रपट हा प्रसिद्ध लेखक चरण सिंग पाठीक यांच्या शॉर्ट स्टोरीवर आधारित आहे. या चित्रपटात दंगल फेम सान्या मल्होत्रा आणि राधिका मदन या मुख्य भुमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.