मलायकाने शेअर केले अर्जुनसोबतचे अनसीन फोटो, पाहा व्हायरल पोस्ट

मलायका अरोरा एका फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मालयकाने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि अर्जुन कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. अर्जुन सोबतच्या तिच्या या फोटोवर अनेक चाहते आपली प्रतिक्रिया देत आहेत. याआधीही तिने थँक्सगिव्हिंगला अर्जुनसोबत फोटो शेअर केला होता.

नुकतंच पोस्ट केलेल्या या फोटोत अर्जुन आणि मलाइका एकत्र हसत उभे दिसत आहे. या फोटोत मलायकाने तोच आऊटफिट परिधान केला आहे, जो तिने धर्मशालामध्ये करीना, सैफ आणि अर्जुनसोबत वॉक करताना घातला होता. हा फोटो पाहताना हा त्याच दिवसाचा असावा, असं वाटत. फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा तू सोबत असतो तेव्हा कोणताही क्षणं निराशेने भरलेला नसतो.’

आपली प्रतिक्रिया द्या