महापुरात दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शकासह संपूर्ण टीम अडकली

639

देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक लोक पुरामध्ये अडकले असून काहींना जीव गमवाला लागला आहे. हिमाचल प्रदेशमध्येही मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून हिमस्खलनही होत आहे. याच महापुरामध्ये मल्याळम अभिनेत्री मंजू वारियरसह दिग्दर्शक सनल कुमार शशिधरण आणि चित्रपटाची संपूर्ण टीम अडकली आहे. हिमाचलच्या चतरू या भागातील पुरामध्ये हे सर्व अडकले आहेत.

सोमवारी रात्री अभिनेत्रीने आपल्या भावाशी सॅटेलाईट फोनच्या मदतीने संपर्क साधला आणि मदत पाठवण्याची मागणी केली. हिमाचलच्या चतरू या भागात अभिनेत्री आणि चित्रपटाच्या टीमसह 220 लोक अडकले आहेत. महापुरात अडकलेल्या लोकांना खाण्या-पिण्याचे सामान मिळण्यासही अडथळा येत आहे. या लोकांकडे फक्त एका दिवसाचे खाद्य वाचले आहे. वेळेत मदत पोहोचली नाही तर पुरात अडकलेल्या लोकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापुराच्या या काळात मोबाईल सेवाही कोलमडली आहे. त्यामुळे अभिनेत्री भावाशी सॅटेलाईट फोनद्वारे संपर्क साधला. आता अभिनेत्रीचा भाऊ मधू याने राज्याचे मंत्री व्ही मुरलीधरण यांच्याशी संपर्क साधून पुरात अडकलेल्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. मुरलीधरण यांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या