मालेगावचा पारा ४२ अंशांवर

60

नाशिक – राज्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून, मालेगावचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे, येथे आज कमाल ४१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. नाशिक शहरातील तापमानही दिवसेंदिवस वाढत असून, आज पारा ३८.६ अंशांवर स्थिरावला. किमान तापमान २० ते २३च्या दरम्यान पोहोचल्याने रात्रीही उकाडा जाणवत आहे. मालेगावसह जिल्ह्यात सर्वत्र दुपारी रणरणत्या उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट असतो.

आपली प्रतिक्रिया द्या