मालेगांव स्फोटातील संशयित आरोपी समीर कुलकर्णींसाठी सुरक्षारक्षक तैनात

1016

2008 साली झालेल्या मालेगांव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा एक हत्यारबंद जवान तैनात करण्यात आला आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगित सुरक्षेची मागणी केली होती. यासंदर्भातील पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते.

मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी आणि सध्या जामिनावर बाहेर असणाऱ्या समीर कुलकर्णींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. कुलकर्णी यांना कोणाकडून धमकी मिळाली आहे का हे त्यांनी स्पष्ट केलेले नव्हते, परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये तातडीने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. समीर कुलकर्णी यांची ऑक्टोबर 2017 मध्ये जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

Malegaon 2008 blast accused Samir Kulkarni has written a letter to Maharashtra CM demanding security. Sameer Kulkarni was released on bail in October 2017. He has not specified the threat to him but has requested CM for security cover on an urgent basis.

— ANI (@ANI) May 11, 2019

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित समीर कुलकर्णी यांची ऑक्टोबर 2017 मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने 9 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 50 हजारांचा जामीन मंजूर करत कुलकर्णी यांना मोठा दिलासा दिला होता.

मालेगावात सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या दुचाकी बॉम्बस्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर शंभरपेक्षा अधिक जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह 12 जणांना संशयित म्हणून अटक केली होती.

समीर यांच्यावर काय़ आरोप आहेत?

भोपाळ येथे राहणारे समीर हे छपाई कामगार होते. मालेगाव बॉम्बस्फोटासाठी त्याने केमिकलचा पुरवठा केल्याचे तसेच बॉम्बस्फोटासाठी नाशिक आणि इंदूर येथे झालेल्या बैठकीत त्याने सहभाग घेतल्याचे त्यांच्यावर आरोप होते.

आपली प्रतिक्रिया द्या