गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे. विक्की और विद्या का वो वाला वीडियो या चित्रपटाद्वारे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. मात्र या प्रमोशन दरम्यान तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
मल्लिका शेरावतने याआधी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही काम केले आहे. यावेळी तिला आलेल्या अनुभवांचा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. मी एका साऊथ गाण्यात काम करत होते. तेव्हा माझ्या डायरेक्टरने माझ्याकडून अनेक अपेक्षा ठेवल्या होत्या. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला – मॅडम, तुम्ही किती हॉट आहात हे आम्हाला दाखवायचे आहे. तेव्हा मी ओके म्हणाले. पण त्याने विचित्र डिमांड केली. तो म्हणाला हिरो तुमच्या कंबरेवर भाकरी भाजणार आहे… ही त्यांची अभिनेत्रीला हॉट दाखवण्याची पद्धत होती. यावेळी मी सरळ गाणे शूट करण्यास नकार दिला. आणि परत कधी त्या दिग्दर्शकासोबत काम केले नाही. असे यावेळी मल्लिका शेरावत म्हणाली.
दरम्यान द रणवीर शोमध्ये बोलत असताना, मल्लिका शेरावतने चित्रपटातील तिचे पूर्वीचे अनुभव शेअर केले. भूमिका मिळविण्यासाठी लोक कसे डिप्लोमैटेकि होतात हे देखील तिने सांगितले. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी चमचगिरी शिकणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्ही टीकू शकता असा धक्कादायक खुलासा यावेळी तिने केला.
मल्लिका शेरावतने अनेक बॉलिवूडमधील हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मर्डर, डरना जरूर है, किस किस की किस्मत, मान गये मुगल-ए-आझम, वेलमक, प्यार के साइड इफेक्ट्स, आगली और पगली, थँक यू, डबल धमाल यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.