मालवण – विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली सुटका

मालवण मसुरे कावावाडी येथील शेत विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभाग कट्टा व वाइल्ड लाईफ इमरजन्सी रेस्क्यू सर्विसेस सिंधुदुर्ग यांनी जीवदान दिले आहे.  कावावाडी इथे राहणाऱ्या येथील बबन वायंगणकर यांना शेत विहिरीत कोल्हा पडल्याचे आढळून आला होता. याची माहिती त्यांनी सर्पमित्र रमण पेडणेकर यांना माहिती दिली होती. कोल्ह्याला बाहेर पडता यावे यासाठी वायंगणकर यांनी इतरांच्या मदतीने बांबू टाकले होते. तोपर्यंत रमण पेडणेकर यांनी वनविभागाला कोल्हा विहिरीत पडल्याचे कळवले होते. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पिंजरा घेऊन पोहोचले, या पथकाने रात्री उशिरा कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढले वाइल्ड लाइफचे अध्यक्ष अनिल गावडे, आनंद बांबर्डेकर, वैभव अमृस्कर, ओंकार लाड, रमण पेडणेकर, सतीश मसुरकर, बबन वायंगणकर, कल्पेश वायंगणकर यांनी मदत कार्यात सहभागी घेत कोल्ह्यास जीवदान दिले. या कोल्ह्याला नंतर जंगलात सोडून देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या