‘कभी खुशी कभी गम’ मधील छोट्या ‘पू’ चे हॉट फोटो..

1409

‘कभी खुशी कभी गम’ मधील करिना कपूरने साकारलेली ‘पू’ म्हणजेच पूजाची भूमिका फार प्रसिद्ध झाली होती. या चित्रपटात पूजाच्या बालपणीची भूमिका साकारणारी घाऱ्या डोळ्यांची बालकलाकार देखील सर्वांना आवडली होती. ती बालकलाकार आता मोठी झाली असून तिचे फोटो पाहून नक्कीच तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. मालविका राज असे तिचे नाव असून ती आता 26 वर्षांची झाली आहे. untitled-2

मालविका ही आता फार सुंदर दिसायला लागली आहे.आणि सोशल मिडियावर तिला बरेच फॉलोअर्स आहेत. तसे मालविका राजचे चित्रपट सृष्टीशी जुने नाते आहे. ती प्रसिद्ध अभिनेते ‘जगदीश राज’ यांची नात आहे.malvika

मालविकाच्या अनेक फोटोजमध्ये तिचा ‘हॉट लुक’ पाहायला मिळतो. कभी खुशी कभी गममधील करिनाची छबी आपल्याला तरुण मालविकामध्ये दिसते असे नेटकऱ्याचे म्हणने आहे. malvika-raj

मालाविका गेल्या काही काळापासून मॉडेलिंगच्या जगात सक्रिय आहे. तिने अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी मॉडेलिंगही केले आहे.untitled-4

आता मालविका पुन्हा रुपेरी पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. ती प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्झोंग्पा यांचा मुलगा रिंझिंग डेन्झोंग्पा याच्यासोबत ‘स्क्वॉड’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.’untitled-3

आता बघुयात की छोट्या पूजा च्या भूमिकेतील प्रेक्षकांची मने जिंकलेली ‘मालविका’ मुख्य अभिनेत्री म्हणून कशी काम करेल.

आपली प्रतिक्रिया द्या