मोदींच्या सभा झाल्यावर प्रचार बंदी कशी? ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगाला सवाल

20

सामना ऑनलाईन । कोलकाता

प्रचाराचा कालाकधी कमी करण्याचा निर्णय हा एक अनैतिक आणि राजकीय पक्षपातीपणा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन सभा पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने केळ दिला. त्यानंतर प्रचारावर बंदी कशी घालण्यात आली, असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

निवडणूक आयुक्त मुकुल रॉय यांना हाताशी धरून भाजपनेच हा सर्व कट रचला असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराचा कालाकधी 20 तासांनी कमी करण्याच्या निर्णय अनपेक्षित होता. या निर्णयामुळे भाजप निवडणूक आयोग चालवत असल्याचे दिसून येत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे हिंसाचार झाला. त्यानंतरही आयोगाने त्यांना नोटीस का बजावली नाही? शहा यांनी अन्याय केला. पण त्याची शिक्षा आम्हाला मिळाली, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी प्रचार बंदीच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला.

नाहीतर दिल्लीत घुसून भाजप कार्यालयाचा ताबा घेतला असता
भाजपने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हिंसाचार केल्याचा आरोप केला आहे. यावरून संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तुमच्या लोकांचे नशीब चांगले आहेत की मी अजूनही शांत आहे. नाहीतर एका सेकंदात दिल्लीतील तुमचे भाजप कार्यालय आणि तुमच्या घरांवर कब्जा केला असता, असे ठणकावले.

एक्झिट पोल संदर्भातील ट्विट हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश
सातव्या टप्प्याच मतदान बाकी असतानाच सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरकर एक्झिट पोल संदर्भातील ट्विट झळकू लागल्याची गंभीर दखल घेत एक्झिट पोलसंदर्भातील सर्व ट्विट तत्काळ हटकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला दिले आहेत. ट्विटर इंडियाकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या