ठाणे क्राईम ब्रँचची कारवाई, ममता कुलकर्णी फरार घोषित, पोलिसांनी घरावर लावली नोटीस

16

सामना प्रतिनिधी, ठाणे

दोन हजार कोटींच्या ‘इफेडरीन’ या अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी आज ठाणे क्राईम ब्रँचने बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला फरार घोषित केले. तशी नोटीसच पोलिसांनी अंधेरी येथील तिच्या ‘स्काय एनक्लेव्ह’ या इमारतीमधील घरावर लावली असून एक महिन्यात कोर्टात हजर न झाल्यास सर्व संपत्ती जप्त करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे क्राइम ब्रँचच्या या कारवाईमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या या तस्करीप्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी याला आरोपी केले आहे. गोस्वामी यालादेखील फरार घोषित केले आहे. तशी नोटीस अहमदाबादमधील त्याच्या घरावर लावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या