मामि फेस्टिव्हलचे बिगूल वाजले! 53 देश… 49 भाषा…190 सिनेमे

देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया मुंबई ऍकेडमी ऑफ मुव्हिंग इमेजेसअर्थात मामिचित्रपट महोत्सवाचे बिगूल वाजले आहे. 17 ते 24 ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव सुरू होणार असून 53 देशांतील 49 भाषांमधील तब्बल 190 दर्जेदार सिनेमे पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. महोत्सवाचे यंदाचे 21वे वर्ष आहे.

यंदा मामि महोत्सवात गीतू मोहनदास यांच्या मुथॉनया मल्याळम चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. महोत्सवात यंदा अबाऊट लव्हया एकमेव मराठी चित्रपटाची वर्णी लागली आहे. इंडिया गोल्ड विभागात या सिनेमाची निवड झाली असून अर्चना फडके यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘बिटर चेस्टनट’, ‘बॉम्बे रोज’, ‘ईब अले ’, ‘गमक घर’, ‘निमतोह’, ‘जस्ट लाईक दॅट’, ‘मरू रो मोती’, ‘आमीस’, ‘दॅट क्लाऊड नेव्हर लेफ्टया सिनेमांचीही या विभागात वर्णी लागली आहे. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्री, दिग्दर्शिका दीप्ती नवल यांना एक्सलंस इन सिनेमाऍवॉर्डने गौरविण्यात येणार आहे.

यंदा पहिल्यांदाच इंडस्ट्री प्रोगॅमहे चर्चासत्र होणार असून यात हिंदुस्थानसह जगभरातील चित्रपटतज्ञ सहभाग घेणार आहेत. जगभरातील चित्रपटसृष्टीला जवळ आणणे आणि एकमेकांशी नवनवीन संकल्पना शेयर करणे यामागचा मुख्य उद्देश आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या