कुत्र्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

13092

कुत्र्यावर बलात्कार करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाला नवी मुंबईतील खारघर पोलिसांनी अटक केली आहे. मुनमुन कुमार गोवर्धन कुमार राम असे त्या विकृत तरुणाचे नाव असून तो खारघरमधील एका हॉटेलमध्य़े कामाला होता.

15 ऑगस्टच्या रात्री काही तरुण खारघर सेक्टर चार मधील मित्राच्या घरी आलेले असताना त्यांनी रस्त्यावर एका तरुणाला कुत्र्यावर बलात्कार करताना पाहिले. त्याचा त्यांनी व्हिडीओ देखील तयार केला. त्यानंतर तो तरुण त्या कुत्र्याला ओरल सेक्स करण्यासाठी जबरदस्ती देखील करत होता. या घटनेची माहिती सोशल मीडियावरून कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय रंगारे यांना मिळाली. त्यांनी याप्रकरणाचा तपास केला असता त्यांना सेक्टर चार मध्ये आरोपी सापडला. तसेच त्यांनी तो व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणांना देखील शोधून काढले.

त्यानंतर रंगारे यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी सुरुवातीला व्हिडीओत सेक्स केल्याचे स्पष्ट दिसत नसल्याचे सांगत कलम 377 अनैसर्गिक सेक्स अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर रंगारे यांनी याबाबत प्राणीमित्र मित अशर व प्राणी संघटना पेटा इंडियाला कळविले त्यानंतर पोलिसांनी कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी रामला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या