महिलेला जिवंत जाळल्याप्रकरणी पती व सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

दारुसाठी पत्नीकडे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंचक नवऱ्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि सासऱ्याने तिला पेटवून दिले. यात होरपळलेल्या विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या खूनाप्रकरणी नवरा आणि सासरा यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

निलंगा तालुक्यातील तळीखेड येथे ज्ञानेश्वर भगवान गड्डीमे हा 29 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास दारू पिउन आला होता. त्याने पत्नीकडे पैसे देण्याचा तगादा लावला. मात्र पत्नी पैसे देत नसल्याने तो शिवीगाळ करू त्यानंतर पतीने व सासऱ्याने मिळून महिलेला पेटवून दिले. सदर महिलेचा 10 मे 2017 रोजी जवाब देणारी पत्नी ही मयत झाली त्यामुळे सदरील गुन्हयामध्ये कलम 302 ची वाढ करण्यात आली . या प्रकरणी न्यायालयाने आज दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.