प्रेयसीवर बलात्कार करून व्हिडीओ व्हायरल केला, आरोपीला अटक

2089

40 वर्षांच्या एका आरोपीला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याने प्रेयसीवर बलात्कार केला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबईतील डीएन नगर पोलिसांनी अशोक कुशाले नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

अशोकचे तक्रारदार महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. अशोकने एका हॉटेलची खोली भाड्याने घेतली आणि तिथे एक कॅमेरा लपवून ठेवला. त्याने प्रेयसीला या रुमवर बोलावलं आणि तिथे बलात्कार केला. या घटनेनंतर या महिलेला बलात्काराचा व्हिडीओ ऑनलाईन अपलोड केला असल्याचं कळालं. तिला हा व्हिडीओ अशोकनेच अपलोड केल्याची खात्री पटली. या महिलेने अशोला गाठून जाब विचारला तेव्हा अशोकने आपणच व्हिडीओ अपलोड केल्याचं कबूल केलं. यानंतर या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.  पोलिसांनी अशोकला अटक केली असून चौकशीमध्ये तो  एका अभिनेत्याच्या बायकोचा ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचं कळालं.

आपली प्रतिक्रिया द्या