सराफाला 13 लाखांचा गंडा घालणाऱ्याला अटक, गुन्हे शाखेची कामगिरी

सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स व्यवसायिकाकडून तब्बल 12 लाख 92 हजारांचे दागिने घेऊन पळ काढणाऱ्या कारागिराला गुन्हे शाखेने हैदराबाद येथून अटक केले. ही घटना रविवार पेठेतील दुकानात घडली होती.

अकबर उफ अतर रफीक मलिक (वय 36) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत घोरपडे (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत यांचा ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडील सोने घेऊन दागिने बनविण्याचे का अकबर काही महिन्यांपासून करीत होता. त्यामुळे अभिजीतचा अकबरवर विश्वास होता.

काही महिन्यांपूर्वी अकबरने दागिने बनविण्याच्या हेतूने अभिजीत यांच्याकडून 363 ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन परत न देता 12 लाख 92 हजारांची फसवणूक केली होती. या संदर्भात गुन्हे शाखेचे गजानन सोनुने आणि कादिर शेख यांना आरोपी अकबरची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याला सिकंदराबाद (हैदराबाद) येथून ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, आंब्रे, किशोर वग्गु, महाजन, गजानन सोनुने, कादिर शेख, निखिल जाधव, समीर पटेल यांच्या पथकाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या