महिलेची सोनसाखळी चोरणारा अटकेत

वॉकला गेलेल्या महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी चोरून पळणाऱया चोरटय़ाला पवई पोलिसांनी 24 तासांत अटक केली. पनेलाल चौहान असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. ही महिला पवईच्या पंच कुटीर परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वी त्या वॉकिंगला गेल्या होत्या. त्या वॉक करून घरी जात होत्या. तेव्हा चौहान हा मागून आला. त्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळ काढला. सोनसाखळी चोरी प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तो दिवा येथे एका जणाकडे राहत असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. तेथून त्याला अटक केली.