ऑर्डर केली आणि झोमॅटोकडून मिळवली फ्री राईड! तरुणाचा महाजुगाड व्हायरल

772

या जगात जुगाड करणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी जुगाड केलेलाच असतो. पण, सध्या एका तरुणाने झोमॅटोकडून फ्री राईड मिळवून केलेला जुगाड चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

तुम्ही विचार करत असाल की झोमॅटो आणि फ्री राईडचा काय संबंध? पण हैदराबाद इथल्या ओबेश नावाच्या तरुणाने झोमॅटोकडून फ्री राईड मिळवली आहे. तीही ऑर्डर करून त्या डिलीव्हरी सकट..त्याचं झालं असं की, ओबेश रात्री 11.50च्या सुमाराला तेथील एका मॉलजवळ फिरत होता. फिरून झाल्यावर त्याने घरी जाण्यासाठी उबेरचं भाडं तपासलं. ते 300 रुपये इतकं दाखवण्यात आलं. त्याला थोडी भूकही लागली होती. म्हणून त्याने झोमॅटोवर आसपासचे पर्याय शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्याला तिथेच एक डोसा सेंटर सापडलं. तिथे त्याने झोमॅटोच्या माध्यमातून खाण्याची ऑर्डर दिली आणि डिलीव्हरीचा पत्ता घरचा दिला.

जेव्हा डिलीव्हरी करणाऱ्या बॉयने ओबेशची ऑर्डर घेतली तेव्हा ओबेशने त्याला फोन केला आणि ऑर्डरची डिलीव्हरी करतेवेळी लिफ्टही मागितली. डिलीव्हरी बॉय राजी झाला आणि त्याने ओबेशला त्याच्या ऑर्डरसकट घरी आणून सोडलं. अशा प्रकारे ओबेशचे पैसेही वाचले, तो घरी पोहोचला आणि त्याला जेवणही मिळालं. झोमॅटोला त्याने यासाठी पाच स्टार मानांकन दिलं आणि गंमत म्हणजे त्याला झोमॅटोनेही ‘आधुनिक समस्यांसाठी आधुनिक उत्तर’ असं गमतीदार ट्वीटही केलं.

आपली प्रतिक्रिया द्या