16 वर्षानंतर लग्नाच्या दाखल्यासाठी केला अर्ज, अधिकाऱ्याने सांगितले पुन्हा लग्न करा

61


सामना ऑनलाईन । मुंबई

लग्नाच्या तब्बल 16 वर्षानंतर लग्न दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्या एका दाम्पत्याला सरकारी अधिकाऱ्याने पुन्हा लग्न करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी त्या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर त्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहेत.

केरळमधील कोझीकोड जिल्ह्यातील मुक्कम गावातील पी.मधूसुदन यांनी उप निंबधक कार्यालयात लग्नाच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता. मात्र मधूसुदन यांचे लग्न 16 वर्षांपूर्वी झालेले आहे. त्यांचा अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून उप निबंधक कार्यालयात पडून होता. याबाबत गेल्या आठवड्यात मधूसुदन यांनी अधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवला असता भर कार्यालयात त्यांची मस्करी करण्यात आली व त्यांना पुन्हा लग्न करा लगेच दाखला देतो असे सांगण्यात आले. त्याविषयी मधुसुदन यांनी त्यांच्या एका मित्राला सांगितले. त्या मित्राने त्यांना याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकण्यास सांगितले. त्या प्रमाणे त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

त्यानंतर या अधिकाऱ्यांकडे वरिष्ठांनी जबाब मागितला असता त्यांनी हे फक्त मस्करी असल्याचे सांगितले. यानंतर त्या चार अधिकाऱ्य़ांना निलंबित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या