प्रेमाला नकार देणाऱ्या तरूणीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न

28

सामना ऑनलाईन,मुंबई

प्रेमाचा प्रस्ताव धुडकावणाऱ्या तरूणीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी एका तरूणाने तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. शंकर भारद्वाज नावाच्या या तरूणाने तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केले.

ही तरूणी आणि शंकर शेजारी शेजारी राहायचे. शंकरला ती तरूणी आवडायला लागली शंकर तिचा रोज पाठलाग कराचाय तिच्यावर सतत पाळत ठेऊन असायचा.शंकरने तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्या तरूणीने तो साफ धुडकावून लावला आणि त्याला हे प्रकार बंद कर असा दमही दिला. आपला प्रस्ताव ही तरूणी धुडकावूच कशी शकते असं म्हणत शंकर संतापला होता, आणि यातूनच त्याने त्या तरूणीचा चेहराच विद्रुप करायचं ठरवलं. यातूनच त्याने तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केले. याप्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून शंकरला पोलिसांनी अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या