आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या मुलाला पोलिसांनी बदडले

1606
प्रातिनिधिक

आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाण्याहून राजस्थानला निघालेल्या एका तरुणाला गुजरात पोलिसांनी अडवून मारहाण केली आहे. या तरुणाने ठाणे पोलिसांकडून रितसर प्रवासाची परवानगी घेतली होती. मात्र तरिही त्याचे काहीही ऐकून न घेता गुजरात पोलिसांनी त्याला मारहाण केली व त्याला परत पाठवले.

भैरुलाल लोहार असे त्या व्यक्तीचे नाव असून तो ठाण्यातील सावरकर नगर मध्ये राहतो. लोहार यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात गावी जाण्यासाठी परवानगी मागितली. पोलिसांना त्याने व्हॉट्सअपवरून आलेले मृत्यूचा दाखला देखील दाखवला. त्यानंतर पोलिसांनी त्याला परवानगी दिली. मात्र गुजरातमधील तलासरी टोल प्लाझाजवळ लोहार यांची गाडी थांबविण्यात आली. तेथे पोलिसांनी लोहार व त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण केली. त्यांनी व्हॉट्सअॅपवरील मृत्यूचा दाखला व वर्तक नगर पोलिसांचे परवानगी पत्र दाखवले तरी त्यांनी त्यांना जाऊ दिले नाही. तसेच त्यांचा मोबाईल देखील फोडला, असा दावा लोहार यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या