मेव्हण्याच्या लग्नाला न गेल्याने जावयाला सासरच्यांनी धुतला

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

गुजरातमधील बोटाडमध्ये एका तरूणाला आणि त्याच्या आईला जाम मारहाण करण्यात आली. कारण होतं मेव्हण्याच्या लग्नाला न जाण्याचं. पिनाकीन सोलंकी याने या मारहाणीबद्दल त्याच्या सासरच्यांविरोधात पोलीस तक्रार नोंदविली आहे. पिनाकीन हा ३४ वर्षांचा असून तो बँकेत कामाला आहे. लग्नाला येता न आल्याचं पिनाकीनने कारणही सांगितलं होतं, मात्र हे कारण न पटल्याने त्याला आणि त्याच्या बायकोला बडवण्यात आलं.

पिनाकीनच्या मेव्हण्याचं म्हणजेच निलेश याचं ५ फेब्रुवारीला लग्न होतं. त्याच दिवशी पिनाकीनचं पदोन्नतीसाठी चं प्रशिक्षण होतं जे बुडवणं म्हणजे पदोन्नतीवर पाणी सोडण्यासारखं होतं. यामुळे त्याने लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला.  १० फेब्रुवारीला पिनाकीन लग्नासाठी माहेरी गेलेल्या त्याच्या बायकोला घेण्यासाठी तिच्या घरी गेला होता. दार उघडताच निकीताच्या घरच्यांनी त्याला लग्नाला न आल्याने शिव्या द्यायला सुरुवात केली. यानंतर त्याचा सासरा ,मेव्हणा आणि मेव्हणीने मिळून त्याला आणि त्याच्या आईला मारहाण केली. यानंतर पिनाकीन याला रुग्णालयात भरती करण्यात आलं तर त्याच्या आईला किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आलं. प्रकृती सुधारल्यानंतर मारहाणीने संतापलेल्या पिनाकीनने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि सासरच्यांविरोधात तक्रार केली.

आपली प्रतिक्रिया द्या