लातूर – पत्नीला काळी म्हणून हिणवणाऱ्या डॉक्टर नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

काळी आहेस, नोकरी करायची नाही, माहेरवरुन प्लॉट घेण्यासाठी 30 लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रतिक्षा संतोष याचावाड यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, डॉ.संतोष गंगाधर याचावाड याच्यासोबत फिर्यादीचे लग्न 26 डिसेंबर 2018 रोजी झाले. नवरा सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत मारहाण करीत असे, उपाशी ठेवत होते. सासू सुरेखा गंगाधर याचावाड, सासरे गंगाधर गोविंद याचावाड व नणंद सुचिता प्रशांत इंद्राळे हे सतत त्रास देत होते.

दवाखान्याच्या विकासकामासाठी वडीलांनी 7 लाख 51 हजार रुपये नवरा संतोष याला दिलेले होते. त्यानंतर पुन्हा दवाखाना बांधकामासाठी व प्लॉट घेण्यासाठी वडीलांकडून 30 लाख रुपये घेऊन ये अन्यथा नांदवणार नाही असे सांगून मारहाण करुन 21 मे 2020 रोजी घरातून हाकलून दिले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात डॉ.संतोष गंगाधर याचावाड, सुरेखा गंगाधर याचावाड, गंगाधर गोविंद याचावाड आणि सुचिता प्रशांत इंद्राळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या