मुलाने 62 वर्षांच्या वडिलांना प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले, हॉटेलमध्ये बुक केली होती रुम

एका तरुणाने त्याच्या 62 वर्षांच्या वडिलांना प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं आहे. या दोघांचा मुलाने व्हिडीओ देखील चित्रीत केला आहे. या दोघांना मुलाने हॉटेलमध्ये पकडले होते आणि तिथे या मुलाची आईदेखील आली होती. आपल्या हॉटेलमध्ये सुरू झालेला वाद डोक्याला ताप देणारा ठरू शकतो हे पाहून हॉटेल मालकाने प्रेमी जोडप्यासह त्यांच्याशी वाद घालणाऱ्यांना हॉटेलबाहेर काढलं.

उज्जैनमधील महाकाल मंदीर परिसरात एका हॉटेलमध्ये 62 वर्षांचे गृहस्थ 60 वर्षांच्या महिलेसह उतरले होते. आपण पती पत्नी आहोत असं या दोघांनी सांगत रुम बुक केली होती. आपले वडील त्यांच्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये राहात असल्याची माहिती तरुणाला मिळाली होती. ही बाब खरी आहे का खोटी हे पाहण्यासाठी हा तरुण त्याच्या आईसह हॉटेलवर पोहोचला. तरुण आणि त्याची आई जेव्हा खोलीत घुसले तेव्हा तरुणाचे वडील आणि त्यांची प्रेयसी एकत्र असल्याचं त्यांना दिसून आलं. हे पाहताच तरुण आणि त्याच्या आईने गोंधळ घालायला सुरुवात केली.

तरुणाचे वडील आणि त्यांची प्रेयसी एकमेकांना फेसबुकवर भेटले होते. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि नकळत प्रेमही फुलत गेले. या जोडप्यातील प्रियकराची स्वत:ची एक कंपनी असून त्यांची प्रेयसी ही जयपूरमध्ये FCI मध्ये विकास अधिकारी म्हणून कामाला आहे. आपल्या वडिलांच्या या प्रेमप्रकरणामुळे आमच्या घरात रोज वाद व्हायचे आणि माझ्या आईला बराच मनस्ताप व्हायचा असं या वृद्ध गृहस्थाच्या मुलाने सांगितलं आहे. शुक्रवारी आपले वडील काहीही न सांगता गेले होते, त्यांच्याकडे जयपूर ते उज्जैन तिकीट होतं असं या तरुणाने सांगितलं आहे. 2 दिवस हा मुलगा वडिलांचा पाठलाग करत होता असंही कळालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या