लग्न जुळवणाऱ्या वेबसाइटवरून ओळख करून तरुणीची फसवणूक

360

लग्न जुळणाऱ्या वेबसाइटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने तरुणीची फसवणूक केल्याची घटना घडली. फसवणूकप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार ही मूळची गुजरातची रहिवासी आहे. ती सध्या कांदिवलीत राहते. तिने लग्न जुळणाऱ्या एका संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. एप्रिल महिन्यात तिने संकेतस्थळावर प्रोफाईल अपलोड केले. प्रोफाईल अपलोड केल्यावर जेनी नावाच्या महिलेशी तिची ओळख झाली. ओळखीनंतर तिला जेनी यामीर नावाची रिक्वेस्ट आली. तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर त्याने तिला व्हॉटस्ऍपवर फोन करून चौकशी केली. आपण मूळचे कर्नाटकचे रहिवासी असून सध्या बर्लिनमध्ये राहतो असे सांगितले.

आठवडाभर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते
माझी आई हिंदुस्थानात येणार असून तिला हॉस्पिटलमध्ये गुंतवणूक करायची असल्याचे तिला सांगितले. विश्वास बसावा म्हणून त्याने तिला बर्लिन ते लंडन व्हाया दिल्ली असे विमानाच्या तिकिटांचे फोटो पाठवले. मे महिन्यात यामीरने तरुणीला आपण आईसोबत दिल्लीला आल्याचे व्हॉटस्ऍपवर सांगितले. त्यादरम्यान तरुणीला एकाचा फोन आला. जेनी आणि यामीरला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 80 लाख रुपये जप्त केले आहेत. करन्सी डिक्लरेशनसाठी 1 लाख 68 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तरुणीने पैसे भरले. पैसे भरल्यावर तरुणीला पुन्हा फोन आला. सिक्युरिटी चार्जेस म्हणून 1 लाख 35 हजार रुपये भरावे लागतील असे तिला सांगितले. तेव्हाही तिने पैसे ऑनलाइन भरले. त्यानंतर टॅक्स म्हणून 3 लाख 89 हजार रुपये पुन्हा भरावे लागतील असे तिला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तिने 35 हजार रुपये ऑनलाइन भरले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या