चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, हत्येनंतर पतीची आत्महत्या

28

सामना ऑनलाईन, बीड

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने एका ५० वर्षांच्या व्यक्तीने पत्नीची हत्या केली आहे. बायकोला ठार मारल्यानंतर पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सुंदर बळीराम मुंडे असं या व्यक्तीचे नाव असून ही घटना बीड जिल्ह्यात असलेल्या केज तालुक्यातील तांबवा गावातील आहे. सुंदर यांनी हे कृत्य गुरुवारी रात्री आठच्या सुमारास केलं असावं असा पोलिसांनी अंदाज बांधला आहे.

सुंदर मुंडेंच्या पत्नी ललिताबाई मुंडे या शिक्षिका होत्या. त्यांच्या चारित्र्यावर सुंदर नेहेमी संशय घेत होते. यावरून दोघांमध्ये भांडणेही होत असावीत असा पोलिसांना अंदाज आहे. गुरुवारी नेमकं काय झालं ज्यामुळे सुंदर यांनी बायकोची हत्या करत आत्महत्या केली, याचा पोलीस तपास करीत आहेत. मुंडे दांपत्याला एक मुलगा आणि ए मुलगी असी दांपत्ये आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या