Shocking News प्रेयसीच्या घरी ‘सेक्स मॅरेथॉन’ दरम्यान प्रियकराचा मृत्यू, Viagra घेऊन तासभर…

एक तासाच्या ‘सेक्स मॅरेथॉन’ दरम्यान 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर व्यक्तीला प्रेयसीने आपल्या घरी बोलावले होते. रात्रीच्या जेवणानंतर दोघेही रोमान्टिक झाले आणि एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. याच दरम्यान प्रियकराला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. डग्लस फंडी मुथुरी असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर घटना केनियाची राजधीनी नैरोबीमध्ये घडली आहे. प्रेयसीसोबत सेक्स करताना प्रियकराला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. याची माहिती मिळताच पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. पोलिसांना तपासामध्ये डग्लसच्या पाकिटामध्ये Furosemide (उच्च रक्तदाबावरील गोळी) आणि Viagra ची गोळी सापडली आहे.

नैरोबीच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, डग्लसची प्रेयसी निकेरा वांगेची हिने त्याला आपल्या घरी बोलावले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. जेवणानंतर दोघे एकमेकांची सोबत एन्जॉय करत असतानाच डग्लसचा श्वास घेण्यास अडचण होऊ लागली आणि तो बेशुद्ध झाला.

यानंतर निकेराने तत्काळ आपातकालीन सेवेसाठी फोन केला. या पथकाचे सदस्य आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा डग्लसचा बेडवरच मृत्यू झाला होता. त्याच्या पाकिटामध्ये उच्च रक्तदाबाची आणि लैंगिक क्षमता वाढवणारी गोळी पोलिसांनी सापडली. त्याच्या मृतदेहावर कोणतेही निशाण नव्हते. त्यामुळे त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. Viagra च्या अतिरिक्त डोसमुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच यावर शिक्कामोर्तब होईल.