
एका माणसाने आपले अंत्यसंस्कार पाहण्यासाठी चक्क त्याने मरण्याचे नाटक केले. असे त्यांनी का केले याचे कारण जाणून सगळ्यांनाच धक्का बसला. आता तो इसम सोशल मीडिावर प्रचंड व्हायरल होत असून युजर्स ट्रोल करत आहेत.
द मिररच्या वृत्तानुसार, आपल्या मृत्यूचे सोंग करणाऱ्या इसमाचे नाव बाल्टाजार लेमोस आहे. ते 60 वर्षांचे असून ब्राझीलच्या कुर्तीबी येथे राहणारे आहेत. त्यांनी मरणाचे नाटक केले आणि आपली अंत्ययात्राही काढून घेतली. मात्र मरणाचे नाटक करुन आपली अंत्ययात्राही काढून घेतली. मात्र त्यानंतर तो आपल्याच अंत्संस्काराचे खोटे नाटक केल्याचे समोर आले त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. याबाबत लेमोसने सांगितले की, मला जाणून घ्यायचे होते की, माझ्या जाण्याने किती लोकांना दु:ख झाले किती लोक अंतिमयात्रेत सहभागी होतात हे त्यांना पाहायचे होते. खरंतर, लेमोसचे हे कृत्य लोकांना अजिबात आवडले नाही, युजर्संनी त्यांच्या या कृत्यामुळे त्याच्यावर प्रचंड संतापले आणि हे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही कोणाच्या भावनांसोबत खेळू शकत नाही.
मागच्या आठवड्यात लेमोस यांनी फेसबुकच्या माध्यमातून त्यांचे निधन झाल्याचे कळवले. त्यावेळी त्यांनी पोस्टमध्ये लिहीले होते की, लेमोस आपल्याला सोडून कायमचे निघून गेले आहेत आणि त्यानंतर अंत्ययात्रा कधी असेल याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. यामध्ये लेमोसचे अनेक मित्रमंडळी, नातेवाईक आले होते. मात्र या दरम्यान मध्येच लेमोसची एण्ट्री झाली आणि सगळे अवाक झाले. याबाबत लेमोस सांगतात की, मागच्या दोन वर्षात शेकडो लोकांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला होता. मी जाणू इच्छित होते की माझ्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोण आलं आणि कोणी दु:ख व्यक्त केले.
एका युजरने लिहीलेय, अशी मजा सहन करण्यापलीकडे आहे, दुसऱ्याने लिहीलेय लेमोसचे हे कृत्य अजिबात आवडलेले नाही. अन्य एकाने लिहीले त्याच्या निधनाची बातमीने पार दु:ख झाले होते, मात्र जीवंत असल्याचे कळल्यावर आश्चर्य वाटले. तर लेमोसच्या काही मित्रांनी त्याला जबरदस्त मारायचे मन करत असल्याचे लिहीलेय.