20 वर्षांपूर्वी घरातून पळालेल्या व्यक्तीची कोरोनाच्या भीतीने घरवापसी

कोरोना नागरिकांत दहशत पसरवत असताना झारखंडच्या धनबादमधील एका कुटुंबाला मात्र कोरोना पावला आहे. धनबादच्या झरिया गावात घरातील वादामुळे परागंदा झालेला सत्यनारायण यादव (55) हा इसम कोरोना संसर्गाच्या भयाने 20 वर्षानंतर घरी परतला आहे. सत्यनारायण घरातून पळून गेला तेव्हा 35 वर्षांचा होता. आज घरी परतताना त्याची पन्नाशी उलटून गेली आहे. त्याचा पत्नीने पोलिसांत आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. पण घरच्या भांडणाला कंटाळून स्वत:च परागंदा होणाऱया सत्यनारायणने घरच्यांना आपला अतापता लागू दिला नव्हता. घरचा प्रमुख पुरुष घरी परतल्याने कोरोनामुळे का होईना पण यादव कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या