आयकीया मॉलमधील बिर्याणीत सापडली अळी

22

सामना ऑनलाईन । हैदराबाद

दुबईतील जगप्रसिद्ध आयकीया मॉल नुकतेच हैदराबादमध्ये सुरू झाले. हे हिंदुस्थानातील सर्वात मोठे मॉल आहे. या मॉलच्या उद्धाटनाच्या वेळी लोकांनी अक्षरश: चेंगराचेंगरी होईल इतकी गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या मॉलमधील फुड कोर्ट वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या फुड कोर्टमधील बिर्याणीत अळी सापडल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीने ट्विटरवरून त्याचा फोटो शेअर केला आहे.

अबीद मोहम्मद असे त्या तरुणाचे नाव असून त्याने आयकीया मॉलमधील फुड कोर्टमध्ये व्हेज बिर्याणी मागवली होती. मात्र काही वेळाने त्याला त्या बिर्याणीत अळी असल्याचे दिसले. त्याने जेवणाचे व अळीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. याप्रकरणी तरुणाने हैदराबाद महानगरपालिकेत तक्रार केली असून पालिकेने आयकीयाच्या प्रशासनाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर आयकीया प्रशासनाने माफी मागितली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या