घराबाहेर फिरणाऱ्या वडिलांविरोधात मुलाने केली तक्रार

लॉकडाऊन असतानाही वडिल दररोज घराबाहेर जातात व नियमांचे पालन करत नाही असे सांगत एका 30 वर्षीय तरुणाने वडिलांविरोधातच पोलिसांत तक्रार दाखल केल्याची घटना दिल्लीतील घडली आहे. याप्रकरणी एका 60 वर्षीयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षिण दिल्लीतील वसंत कुंजमधील राजकोरी परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय मुलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वडिल दररोज रात्री आठ वाजता घराबाहेर पडतात व रस्त्यावर फिरत असतात. त्यांना आम्ही घरातून बाहेर पडू नका असं सांगतो तरी ते ऐकत नाही. त्यांच्यामुळे आम्हालाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता तुम्हीच यावर तोडगा काढा अशी विनंती मुलाने पोलिसांना केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मो़डल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या