‘तारीख पे तारीख’ला कंटाळून न्यायालयातच विष घेतले

25

सामना प्रतिनिधी । अंबड

सावत्र आजीकडून वाटणीने जमीन मिळवण्यासाठी न्यायालयात चालू असलेल्या दिवाणी दाव्याचा निकाल लवकर लागत नसल्याच्या नैराश्याने सुनील सुभाष लागडे (२८) या तरुणाने आज २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुनील लागडेचे वडील सुभाष लागडे यांचा मृत्यू झालेला असून त्यांचा अंबडच्या न्यायालयात अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील जमिनीबाबत चुलत आजी व सावत्र चुलते यांच्या बरोबर वारसाचा दावा चालू होता. २०१० ला हा दावा दाखल झाल्यापासून प्रत्येक सुनावणीनंतर तारखा पडत होत्या. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने प्रत्येक वेळी सुनावणीला हजर राहणे आणि त्यासाठीचा खर्च करणे सुनीलला परवडत नव्हते. या परिस्थितीने गांजल्याने सुनील याने न्यायालयाच्या तिसऱ्या दालनात विष प्राशन केले.

प्रसंगावधान राखून न्यायालयातील शिपाई व उपस्थित वकील मंडळीनी त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु झाले असून आता त्याची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घरची परिस्थिती अंत्यत बिकट असल्यामुळे सुनील लागडे हे मामाच्या गावी धाकलगाव येथे राहून अंबड येथे एका दुकानात कामाला होता. या कमाईतून त्याचा घरखर्च चालवला जात होता. परंतु, न्यायालयात खटला लढवायचा म्हणजे लागणाऱ्या खर्चासाठी पैसा उभारणे त्याला अवघड होत चालले होते. आता त्याच्या प्रकरणाची पुढची तारिख २३ मार्च असल्याचे संबंधित वकिलांनी सांगितले. सुनीलचे वकील अ‍ॅड. आर. एस. काफरे आहेत तर प्रतिवादीचे वकील अ‍ॅड. राजेश्वर देशमुख आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत. परिस्थितीने गांजल्याने सुनील याने न्यायालयाच्या तिसऱ्या दालनात विष प्राशन केले.

प्रसंगावधान राखून न्यायालयातील शिपाई व उपस्थित वकील मंडळीनी त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु झाले असून आता त्याची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे सुनील लागडे हे मामाच्या गावी धाकलगाव येथे राहून अंबड येथे एका दुकानात कामाला होता. या कमाईतून त्याचा घरखर्च चालवला जात होता. परंतु, न्यायालयात खटला लढवायचा म्हणजे लागणाऱ्या खर्चासाठी पैसा उभारणे त्याला अवघड होत चालले होते. आता त्याच्या प्रकरणाची पुढची तारीख २३ मार्च असल्याचे संबंधित वकिलांनी सांगितले. सुनीलचे वकील अ‍ॅड. आर. एस. काफरे आहेत तर प्रतिवादीचे वकील अ‍ॅड. राजेश्वर देशमुख आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या