नाण्यामुळे फळफळलं नशीब, 1400च्या बदल्यात मिळाले 138 कोटी

अनेकदा आपल्याला सर्वसामान्य वाटणाऱया गोष्टीत काहीतरी गूढ लपलेलं असतं. अमेरिकेत 20 डॉलर म्हणजेच अवघ्या 1400 रुपयांच्या नाण्यांसाठी तब्बल 138 कोटी रुपयांची बोली लागली आहे. न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी 1933 सालच्या डबल इगल सोन्याच्या नाण्याचा लिलाव झाला होता. या नाण्याच्या लिलावाने आतापर्यंत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. या अत्यंत साधारण दिसणाऱया खास नाण्याची 18.9 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 138 कोटींमध्ये विक्री झाली आहे. या डबल इगल सोन्याच्या नाण्यासह जगातील सर्वात दुर्लभ तिकिटांचीदेखील 60 कोटी रुपयांत विक्री झाली आहे. स्टुअर्ट विट्समॅन यांनी हे नाणं विकलं आहे. 2002मध्ये त्यांनी हे नाणं 55 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. या नाण्याची 73 ते 100 कोटी दरम्यान बोली लागेल, अशी त्यांना आशा होती.

आपली प्रतिक्रिया द्या