मोठेपणाची मोठी समस्या! नोकरी न मिळण्यासाठी असेही कारण असू शकते? वाचा बातमी

एखाद्या व्यक्तिला नोकरीची अत्यंत गरज असताना बरेचदा त्याला संधी मिळत नाही. संधी मिळाली तरी बऱ्याच ठिकाणी नकार मिळतो. त्याची कारणं विविध असू शकतात. कधी शिक्षण पुरेसं नसतं तर कधी अनुभव तोकडा असतो. पण, एका तरुणाला मात्र भलत्याच कारणासाठी नोकरीची संधी मिळेनाशी झाली आहे.

या तरुणाचं नाव जो असं आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, जोला नोकरीची गरज आहे. पण, त्याला नोकरी नाकारली जाते. याचं कारण मात्र त्याचं शिक्षण किंवा अनुभव नसून त्याची विशिष्ट शारीरिक ठेवण आहे. जोचं गुप्तांग सामान्य पुरुषांच्या तुलनेने मोठं आहे आणि तेच त्याच्या नोकरीच्या मधला अडथळा ठरत आहे.

वास्तविक एखाद्याची शारीरिक ठेवण हा काही अपवाद वगळता इतर प्रकारच्या नोकऱ्यांशी संबंधित विषय नाही. पण, इथे मात्र ती समस्या बनली आहे. जोचं गुप्तांग जवळपास 7 इंच लांब आहे. त्यामुळे त्याला विशिष्ट प्रकारचं अंतर्वस्त्र घालावं लागंत. कारण, अनेकदा त्याच्या नैसर्गिक आकारामुळे नोकरीसाठीची मुलाखत सुरू असताना तो उत्तेजित होत असल्याचा गैरसमज होतो आणि त्याला नकार मिळतो.

त्याला बऱ्याच नोकऱ्यांमध्ये तसं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. वास्तविक लैंगिक सुख मिळवण्याच्या दृष्टीने गुप्तांगाची लांबी जास्त असणं हे कित्येक पुरुषांचं स्वप्न असतं. इथे मात्र जोच्या बाबतीत ती भलतीच अडचण ठरत असून आता त्याला शस्त्रक्रिया हा एकमेव मार्ग उरला आहे.