क्षुल्लक कारणावरून तलाक देणे पडले महागात, सासरच्यांनी पतीला दिला चोप

देशात तिहेरी तलाक देणे कायदेशीर गुन्हा आहे. असे असेल तरी पश्चिम बंगालमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला क्षुल्लक कारणावरून तीन तलाक देऊन घराबाहेर काढले. त्यामुळे पीडित महिलेच्या कुटुंबीयांना पतीला जबर मारहाण करून त्याला चपलांचा हार घातला आहे.

पश्चिम बंगालच्या दिनजापूर जिल्ह्यात फिरौदा आणि तौफिक हे दाम्पत्य रहात होते. दोघांचे लग्न झाल्यापासून सारखे खटके उडत होते. शनिवारी फिरौदा काही कामानिमित्त शेजारच्या घरात गेली होती. तेव्हा तौफिक घरी आला आणि फिरौदा घरी नव्हती. त्यामुळे तौफिक चांगलाच चिडला. फिरौदा घरी आल्यानंतर दोघांमध्ये भांडणे झाली आणि भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले.

नंतर तौफिकने रागाच्या भरात फिरौदाला तीन तलाक देऊन घराबाहेर काढले. फिरौदाने आपल्या माहेरच्या माणसांना बोलावून घेतले. त्यांनी तौफिकची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तौफिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. मत फिरौदाच्या माहेरच्यांना चांगलाच राग आला. त्यांनी तौफिकला चांगलाच चोप दिला. त्याच्या गळ्यात चपलांचा हारही घातला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या