लव्ह मॅरेजनंतर तीन वर्षांनी परतला जावई, सासुरवाडीच्या लोकांनी केली धुलाई

सर्वसाधारणपणे कुटुंबात जावयाला विशेष मान असतो. पण, जर हे लग्न मनाविरुद्ध असेल तर मात्र अनेकांसाठी जावई नकोसा असतो. अशा लग्नात कधीकधी जावयाच्या जिवाला धोका होऊ शकतो. अशीच काहीशी घटना राजस्थानच्या धौलपूर येथे घडली आहे.

येथे एका जावयाला सासुरवाडीकरांकडून धुलाईचा पाहुणचार मिळाला आहे. त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे. येथील बाडी थाना परिसरातील एका तरुणाचे तिथेच राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचं नातं त्यांच्या कुटुंबीयांना मंजूर नव्हतं.

त्यामुळे त्यांनी 27 सप्टेंबर 2018 रोजी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघंही पुन्हा या गावात आले नव्हते. तीन वर्षं लोटल्यानंतर कोरोना महामारीमुळे त्यांना भुकेकंगाल होण्याची वेळ आली. त्यामुळे ते पुन्हा गावात परतले.

मुलीच्या कुटुंबाला जसं जावयाच्या घरी परत येण्याची बातमी कळली, तसे ते त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी लाठ्याकाठ्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. नशिबाने त्याला वाचवायला त्याची बायको आली आणि तिने पोलिसांना बोलवून त्याला सोडवलं.

सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्याला मारणाऱ्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या