पुणे – पत्नी आणि सासूच्या छळास कंटाळून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

पत्नी आणि सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरूण बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकाळभोर परिसरातील कदमवाक वस्तीवर घडली आहे. कुटुंबियांपासून वेगळे राहण्यास भाग पाडणे, घरच्यांसोबत बोलू न देणे असा त्रास या दोघींनी पीडित तरूणाला दिला होता. या छळाला कंटाळून तरूणाने स्वयंपाकघरात गळफास घेउन आत्महत्या केली. रोहित असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी रश्मी आणि सासू लता यांच्याविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रोहित आणि रश्मीचे नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर दोन महिने झाल्यानंतर रश्मीने रोहितच्या मागे त्याच्या घरच्यांपासून वेगळं राहण्याचा तगादा लावायला सुरुवात केली. यानंतर तिने आणि तिच्या आईने म्हणजेच लता हिने रोहितवर त्याच्या घरच्यांसोबत बोलायचे नाही अशी जबरदस्ती करायला सुरुवात केली. या सगळ्याला कंटाळून रोहितने 10 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बी. जी. शेंडगे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या