चुकून पिस्तुलवर बसल्याने गुप्तांगात घुसली गोळी

14

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात चुकून पिस्तुलवर बसल्याने गुप्तांगात गोळी घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिस्तुलवरील लक्ष विचलीत होणे त्या व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. कॅडरिक जेल्क्स (३८) असे या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कॅडरिकने गाडी चालवताना पिस्तुल सीटवर ठेवले होते. काही काळासाठी गाडीबाहेर उतरल्यानंतर कॅडरिक गाडी चालवण्यासाठी बसला, मात्र बसताना सीटवर ठेवलेल्या पिस्तुलवर लक्ष न दिल्याने ट्रिगर दाबला गेले आणि गोळी सुटली. गोळी थेट गुप्तांगाला लागली. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेला कॅडरिक त्याच अवस्थेत घरी आला. गंभीर अवस्थेतील कॅडरिकला शेजाऱ्याने रक्ताने भिजलेला पाहिल्यावर तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

आपली प्रतिक्रिया द्या